यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या बी आर्च अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये कोकरे प्रणव (81.4%), मुलांणी सिमरन (80.6%), जगदाळे वैष्णवी (78.7%) या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. आर्किटेक्चर चा पदवी अभ्यासक्रम हा पाच वर्षांचा असून, कल्पक विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून देणारा हा कोर्स विद्यार्थ्या साठी महत्त्वाचा मानला जातो. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्सचे मुख्य ध्येय व्यावसायिकता, सर्जनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देणे आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एका गतिमान वातावरणात त्यांचे ज्ञान लागू करणे अपेक्षित आहे अशा सेटिंगच्या समोर येतात. विद्यार्थ्यांची शिकण्याची आवड वाढवण्याबरोबरच, हे शैक्षणिक प्रक्रियेचा एक महत्त्वाचा घटक आहे. आर्किटेक्चरच्या शिक्षणामध्ये स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रातील औपचारिक प्रशिक्षण आणि शिक्षण यांचा समावेश होतो. यात सामान्यतः शैक्षणिक अभ्यासक्रम आणि व्यावहारिक अनुभव यांचे संयोजन समाविष्ट असते.